IPL 2023 : धोनीच्या दुखापतीबाबत प्रशिक्षकाचे मोठे अपडेट, GT विरुद्ध व्यथित होता कर्णधार


एमएस धोनीच्या फिटनेसबाबत गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांसाठी त्रासदायक बातमी आहे. आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी त्याच्याबद्दल बातमी आली होती की तो गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना खेळू शकणार नाही, कारण सरावाच्या वेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर धोनी गुजरातविरुद्धही मैदानात उतरला, मात्र सामन्यादरम्यान त्याला वेदना होत होत्या.

दीपक चहरच्या चेंडूवर राहुल तेवतियाचा फटका रोखण्यासाठी धोनीने डाईव्ह मारला, तो खाली पडला, तेव्हा तो त्याच गुडघ्यावर पडला, त्यात दुखापत झाल्याची बातमी आहे. खाली पडताच धोनीला वेदना होत होत्या. आता CSK प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या फिटनेसबद्दल एक मोठा अपडेट दिला आहे.


यानंतरही धोनी खेळत राहिला. आता फ्लेमिंगने सांगितले की धोनीला क्रॅम्पमुळे दुखत होते. प्री-सीझनच्या संपूर्ण महिन्यात तो त्याच्या गुडघेदुखीवर काम करत होता, पण त्याला फक्त सामन्यादरम्यान क्रॅम्प आले होते. मात्र, असे असूनही धोनी पुढचा सामना खेळू शकणार नसल्याच्या बातम्या आहेत.

CSK त्यांचा पुढील सामना 3 एप्रिल रोजी चेन्नई येथे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळेल आणि CSK विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागल्याने चेन्नईला लवकरच आपल्या कमकुवतपणावर मात करावी लागणार आहे.