भारतीय क्रिकेटपटूच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, ऑडिओ लीक झाला आणि खाल्ले विष


आजकाल क्रीडा विश्वात लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जिम्नॅस्टिक्स, सेलिंग आणि सायकलिंगनंतर आता या यादीत क्रिकेटचाही समावेश झाला आहे. डेहराडूनमध्ये क्रिकेट अकादमी चालवणारे आणि भारतीय महिला क्रिकेटपटूचे माजी प्रशिक्षक नरेंद्र शाह यांच्यावर अलीकडेच गंभीर आरोप झाले आहेत. शाह यांच्यावर त्यांच्या अकादमीतील तरुण मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. एका मुलीने प्रशिक्षक शाह यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाचा ऑडिओ लीक केल्याने हा मुद्दा समोर आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहने या दहावीत शिकणाऱ्या मुलीचे अनेकदा शोषण केले. समोर आलेल्या ऑडिओमध्ये शाहने तरुणीशी अश्लील संभाषण केले होते आणि सेक्शुअल फेवरही मागितले होते. हा ऑडिओ व्हायरल होताच प्रशिक्षक शाह यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या ते रुग्णालयात आहेत.

शाह यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ डेहरडूनमधील त्यांच्या पदावरून तत्काळ हटवण्यात आले. तरीही ते चमोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. ऑडिओ लीक करणारी तरुणी ही चमोलीची रहिवासी आहे. सोमवारी रात्री, अकादमीमध्येच प्रशिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर शाह यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध आयपीएल कलम 354-ए (शारीरिक अत्याचार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नरेंद्र शाह अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत आणि त्यांच्या पत्नीनेही अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. डेहराडूनचे एसएसपी दलीप सिंह कुंवर सिंह यांनी सांगितले की, तपास सुरू करण्यात आला असून आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. शाह हे स्टार भारतीय महिला क्रिकेटपटूचे माजी प्रशिक्षक आहेत. या खेळाडूने नुकतेच टीम इंडियासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळून मोठे नाव कमावले आहे.