IPL 2023 सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सचा खेळाडू चमकला, झाला अव्वलस्थानी विराजमान


पाकिस्तानला आपल्या फिरकीवर नाचवणाऱ्या राशिद खानने कमाल केली आहे. अफगाणिस्तानचा हा लेगस्पिनर पुन्हा एकदा T20 क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत राशिद खान पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने वनेंदू हसरंगाला माघारी टाकले.

राशीद खानने पाकिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांत तीन विकेट घेतल्या, पण त्याचा इकॉनॉमी रेट अप्रतिम होता. या खेळाडूने पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये एकही चौकार-षटकार दिला नाही. राशीद खानच्या तगड्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. अफगाणिस्तानने ही मालिका 2-1 ने जिंकली. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानचा मालिकेत पराभव केला.

दरम्यान राशिद खान आता IPL 2023 मध्ये नंबर 1 T20 गोलंदाज म्हणून प्रवेश करेल. राशीद खान हा गुजरात टायटन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूने गेल्या मोसमात 16 सामन्यांत 19 बळी घेतले होते आणि त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक फक्त 6.6 धावा होता. राशिद खानच्या या गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल जिंकले.

राशिद खान व्यतिरिक्त मोठी बातमी म्हणजे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. आता नंबर 1 वनडे गोलंदाज जोश हेझलवूड आहे. हेजलवूड आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टी-20 फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सूर्यकुमारची ताकद कायम आहे. सूर्यकुमार यादवचा वनडे फॉरमॅटमध्ये फॉर्म खराब होत असला तरी आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे.