IPL 2023 मध्ये फळफळणार अर्जुन तेंडुलकरचे नशीब, जाणून घ्या त्याला मिळू शकते का मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी?


इंडियन प्रीमियर लीगमधील अनेक संघांना यावेळी दुखापतीचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही यावेळी लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. बऱ्याच दिवसांपासून दुखापतीने त्रस्त असलेला बुमराह आयपीएलमध्ये परतणार नाही. बुमराहचा बाहेर पडणे ही संघासाठी एक वाईट बातमी आहे, पण ज्या तरुणांना आतापर्यंत या संघाकडून खेळता आलेले नाही, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या नावाचाही समावेश आहे.

मुंबई इंडियन्स हा या लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने पाच विजेतेपद जिंकले आहे. परंतु यावेळी हा प्रवास संघासाठी खूप कठीण जाणार आहे. संघाचे गोलंदाजी आक्रमण मजबूत दिसत नाही. बुमराहशिवाय संघाचा विदेशी वेगवान गोलंदाज जे रिचर्डसन देखील संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर आहे. या दोन खेळाडूंना वगळल्यामुळे अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर 2021 साली संघात सामील झाला. टीम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन सारखे खेळाडू असल्याने अर्जुनला संधी मिळाली नाही, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. अर्जुनला संधी दिल्यास मुंबईच्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही गहराई वाढेल. तो कॅमेरून ग्रीनसोबत चांगला खेळू शकतो. अर्जुन तेंडुलकरने गेल्या देशांतर्गत हंगामातही चांगला खेळ दाखवला होता, त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता खूप जास्त आहे.

अर्जुन तेंडुलकर यावेळी रणजी ट्रॉफीचा अनुभव घेऊन आयपीएलमध्ये प्रवेश करेल, ज्यामुळे तो पदार्पणाचा मोठा दावेदार आहे. अर्जुनने गोव्याकडून खेळताना रणजी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 547 धावा केल्या आहेत आणि 12 बळीही घेतले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुनने नऊ टी-20 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 12 विकेट आणि 180 धावा केल्या आहेत.