नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार झाला आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर व्यवस्थापनाने राणावर विश्वास दाखवला. आता संघाला विजेतेपदापर्यंत नेण्याची जबाबदारी राणावर आहे. राणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याची पत्नी सांची मारवाह ही एक पुरस्कार विजेती इंटिरियर डिझायनर आहे.
सांचीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कलात्मक आहे. तिची आई म्हणजेच नितीश राणाची सासू संगीता या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कांस्य शिल्पकार आहेत.
सांची आणि नितीश हे दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे समर्थक आहेत. 2016 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. खरे तर सांचीचा भाऊ परम हा अनेकदा नितीशसोबत फुटबॉल खेळायचा. त्यामुळे सांची मैदानावर यायची.
दुसरीकडे सांचीला पाहून नितीश एकतर्फी प्रेमात पडला. नंतर त्याला कळले की सांची ही परमची बहीण आहे. यानंतर त्याने एक पाऊल पुढे टाकत मेसेज केला.
यानंतर सांची आणि नितीश यांच्यात चर्चा सुरू झाली. नितीश आणि सांची यांची 2018 मध्ये एंगेजमेंट झाली आणि वर्षभरानंतर 2019 मध्ये दोघांनी लग्न केले.