विराट कोहली लवकर बाद झाल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझहर अलीचे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. कोहलीने धावा केल्या असत्या तर उपद्रवी लोकांनी अजहरचे घर पेटवून दिले असते. खुद्द पाकिस्तानी खेळाडूने याचा खुलासा केला आहे. धावांचा पाठलाग करण्यात कोहली मास्टर आहे. भारतासाठी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने 46 पैकी 22 एकदिवसीय शतके ठोकली आहेत, जो एक विक्रम आहे. भारताचा माजी कर्णधार कोहलीला पाकिस्तानविरुद्ध खेळायला आवडते.
कोहली आऊट झाला म्हणून वाचले पाकिस्तानी खेळाडूचे घर, धावा केल्या असत्या तर उद्ध्वस्त झाले असते घर !
कोहलीची या संघाविरुद्ध वनडेमध्ये सरासरी 48.72 आणि टी-20 मध्ये 81.33 आहे. मात्र, काही महत्त्वाच्या प्रसंगी तो पाकिस्तानविरुद्ध फ्लॉपही ठरला. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याला 9 चेंडूत केवळ 5 धावा करता आल्या होत्या, मात्र अझहर अलीच्या घरचे तो लवकर बाद झाल्यामुळे बचावले.
खरंतर कोहलीला त्याच्या डावाच्या 8व्या चेंडूवर जीवदान मिळाले. पहिल्या स्लिपमध्ये अझहर अलीकडून त्याचा झेल सुटला. झेल सुटल्यानंतर अझहर घाबरला होता. नुकताच त्यानेच याबाबत खुलासा केला आहे. कोहलीचा झेल चुकवल्यानंतर त्याच्यावर खूप दडपण जाणवू लागले. ‘हसना मना है’ शोमध्ये अझहरने खुलासा केला की, जर कोहलीने मोठी धावसंख्या केली असती तर संपूर्ण देश त्याला काय म्हणेल या विचाराने तो घाबरला होता. आपले घर उद्ध्वस्त होईल अशी भीती त्याला वाटू लागली होती.
पुढच्याच चेंडूवर कोहली बाद झाला तरी. यानंतर अझहरच्या जीवात जीव आला.पाकिस्तानने दिलेल्या 339 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडिया 30.3 षटकात 158 धावांवर सर्वबाद झाली आणि पाकिस्तानने अंतिम सामनाही 180 धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. अझहरने अंतिम सामन्यात 59 धावा केल्या. त्याचवेळी फखर जमानने 114 धावांची खेळी केली. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 76 धावा केल्या.