जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला स्टीव्ह स्मिथ यावेळी आयपीएल 2023 मध्ये वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या ऑस्ट्रेलियन खेळाडूने लिलावातून आपले नाव मागे घेतले होते, मात्र असे असतानाही स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये आपली क्षमता दाखवणार आहे.
IPL 2023 मध्ये स्टीव्ह स्मिथची एन्ट्री, मिळाला मैदानाबाहेर ‘रोजगार’
आश्चर्यचकित होऊ नका, प्रत्यक्षात स्टीव्ह स्मिथ आयपीएल 2023 मध्ये कॉमेंट्री करणार आहे. आयपीएलमध्ये 103 सामने खेळणारा हा खेळाडू आता आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचणार आहे. स्टीव्ह स्मिथ किती सामन्यांसाठी समालोचन करेल हे स्पष्ट नाही, परंतु या खेळाडूने नवीन खेळपट्टीवर पदार्पण करण्याचे निश्चित केले आहे.
स्टीव्ह स्मिथ शेवटचा आयपीएल 2021 मध्ये खेळला होता. गेल्या वर्षी या खेळाडूला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. त्याचवेळी त्याने आयपीएल 2023 च्या लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
स्टीव्ह स्मिथने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. धोनीसारखा खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. स्मिथने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 34.51 च्या सरासरीने 2485 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचे एक शतक आणि 11 अर्धशतके आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 128 होता.
जरी स्टीव्ह स्मिथ आयपीएल 2023 मध्ये खेळत नसला तरी त्याच्या देशातील अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत दिसणार आहेत. डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय कॅमेरून ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श, टिम डेव्हिड या खेळाडूंची ताकद पाहायला मिळणार आहे.