भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनला एचआयव्ही चाचणी करावी लागली. याचा खुलासा खुद्द त्यानेच स्वतः केला. भारतीय सलामीवीराने खुलासा केला की मनालीच्या ट्रिपनंतर तो इतका घाबरला होता की त्याला एचआयव्ही चाचणी करावी लागली. ही चाचणी घेण्यामागचे कारणही त्याने सांगितले. स्पोर्ट्स तकशी बोलताना गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेल्या धवनने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याने या चाचणीबाबत खुलासाही केला.
शिखर धवनने केली एचआयव्ही टेस्ट, मनाली ट्रिपनंतर उडाली होती गब्बरची घाबरगुंडी
खरंतर धवनला टॅटूची खूप आवड आहे. एकदा तो घाबरला होता, कारण त्याचा टॅटू वापरलेल्या सुईने बनवला होता आणि या भीतीमुळे त्याने एचआयव्ही चाचणी करून घेतली होती. यादरम्यान धवनने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळाबाबतही सांगितले.
भारतीय फलंदाजाने सांगितले की, वयाच्या 14-15 व्या वर्षी तो मनालीच्या सहलीला गेला होता आणि त्याच प्रवासात त्याने घरच्यांना न सांगता पाठीवर टॅटू काढला. सुमारे 3-4 महिने त्याने हा टॅटू घरच्यांपासून लपवून ठेवला, मात्र वडिलांना समजल्यानंतर त्याचा वडिलांनी चांगलाच समाचार घेतला. धवन म्हणतो की, टॅटू बनवल्यानंतर तो खूप घाबरला होता, कारण एका सुईने किती जणांनी टॅटू काढला याची त्याला कल्पना नव्हती.
टॅटूनंतर धवनची एचआयव्ही चाचणी झाली, जी त्यावेळी निगेटिव्ह आली. धवनने त्याच्या पाठीवर पहिला टॅटू काढला, जो स्कॉर्पिओचा होता. त्याच्या हातात भगवान शंकराचाही टॅटू आहे. अर्जुनचा एक टॅटूही आहे. अर्जुन हा जगातील सर्वोत्तम तिरंदाज होता, असे धवनने म्हटले आहे. धवनने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथीबद्दलही सांगितले. वास्तविक धवन त्याची पत्नी आयेशा मुखर्जीपासून वेगळा झाला आहे. घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याचे त्याने सांगितले.