IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने ‘बाहेर’ केलेला खेळाडू आता होणार कर्णधार!


बॉलने मॅचला कलाटणी देणे असो कि बॅटने षटकार आणि चौकार मारणे… ही अष्टपैलू शार्दुल ठाकूरची खासियत आहे, जो आयपीएल 2023 मध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये दिसू शकतो. शार्दुल ठाकूर आयपीएलच्या चालू हंगामात कर्णधार होऊ शकतो. आयपीएलच्या 16व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सने अद्याप कर्णधाराची घोषणा केलेली नाही. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता प्रश्न आहे की केकेआरचा कर्णधार कोण?

केकेआरचे संघ व्यवस्थापन नव्या कर्णधारासाठी व्यस्त आहे, मात्र संघाच्या कर्णधाराचे नाव शेवटच्या क्षणापर्यंत उघड न होणे ही खेळाडू आणि संघाचे मनोधैर्य खच्ची करणारी गोष्ट नाही. कर्णधारपदाचे दावेदार म्हणून 3 नावांचा विचार केला जात असून त्यात शार्दुल ठाकूरच्या नावाचाही समावेश आहे.

आयपीएलमधील 75 सामन्यांचा अनुभव असलेला शार्दुल ठाकूर कोलकात्याच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हा खेळाडू 2015 पासून आयपीएल खेळत असून गेल्या दोन मोसमात शार्दुलने 36 विकेट घेतल्या आहेत. ठाकूरसाठी शेवटचा हंगाम चांगला नसला तरी 14 सामन्यांत त्याला केवळ 15 विकेट घेता आल्या. त्याचा इकॉनॉमी रेटही प्रति षटक 9.79 धावा होता.

कर्णधारपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव म्हणजे सुनील नरेन. सुनील हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने अनेक वेळा आपली योग्यता सिद्ध केली आहे. त्याची गूढ फिरकी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरते, खेळाडू म्हणून त्याचे रेकॉर्ड चांगले असले तरी कर्णधारपदात तो छाप पाडू शकला नाही. ILT20 मध्ये सुनील नरेनला अबू धाबी नाईट रायडर्सचा कर्णधार बनवण्यात आले, जेथे तो काही आश्चर्यकारक करू शकला नाही. संघ स्पर्धेत फक्त 1 सामना जिंकू शकला आणि 8 सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. नरेनने केकेआरसाठी 148 सामन्यांत 152 विकेट्स घेतल्या आहेत आणि याशिवाय त्याची फलंदाजीही सामन्याला कलाटणी देऊ शकते.

केवळ शार्दुल आणि सुनील नरेनच नाही तर नितीश राणाही कर्णधारपदाच्या शर्यतीत पुढे आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने 91 आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याच्या बॅटमधून 2181 धावा झाल्या आहेत. या खेळाडूचा स्ट्राईक रेट 134 पेक्षा जास्त आहे. आता हे पाहावे लागेल की केकेआर व्यवस्थापन कर्णधारपद कोणाकडे सोपवते?