विराट कोहलीवर संतापला सेहवाग, बालिश चुकीमुळे रेकॉर्ड चुकला, मग संतापाचा भडका


भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जात होता. त्याच्या समोर येताच गोलंदाजांच्या कपाळावर सुरकुत्या पडायच्या. हा उजव्या हाताचा फलंदाज कसोटीत त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठीही प्रसिद्ध होता. सेहवाग केवळ फलंदाजीने संघासाठी योगदान देत नसला तरी गरज पडेल, तेव्हा गोलंदाजीही करत असे. आपल्या ऑफ स्पिनच्या जोरावर त्याने भारताला अनेक वेळा यश मिळवून दिले आहे. आता सेहवागने विराट कोहलीमुळे गोलंदाजीतील एक मैलाचा दगड गमावल्याचा एक किस्सा सांगितला आहे.

सेहवागने भारतासाठी 251 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 96 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर या खेळाडूने भारताकडून कसोटीत 104 सामने खेळले असून 40 बळी घेतले आहेत. टी-20 मध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही.

सेहवाग म्हणाला की, त्याने आपल्या गोलंदाजीने अनेक मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. सेहवागने BeerBiceps नावाच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, त्याने आपल्या चेंडूने अनेक बड्या फलंदाजांना बाद केले आहे. रिकी पाँटिंग, मायकेल हसी, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान आणि ब्रायन लारा यांसारख्या फलंदाजांना मी बाद केल्याचे सेहवागने सांगितले. तो म्हणाला की एकदा त्याने अॅडम गिलख्रिस्टला पॅव्हेलियनचा रस्ताही दाखवला होता. सेहवागने विराट कोहलीची एक चूक आठवली आणि सांगितले की विराट कोहलीने एकदा एका सामन्यात त्याच्या चेंडूवर मिड-विकेटवर एक अतिशय सोपा झेल सोडला आणि यामुळे तो खूप संतापला, कारण त्यामुळे एक विक्रम चुकला होता.

सेहवागनेही कोहलीचे कौतुक करत सांगितले की, कोहली एवढ्या उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. सेहवाग म्हणाला की, कोहलीच्या प्रतिभेवर कोणालाही शंका नाही, पण कोहली आज जिथे आहे, तिथे पोहोचेल, अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती. सेहवाग म्हणाला की कोहली 70-75 शतके करेल किंवा 25,000 धावा पूर्ण करेल असे मला वाटत नव्हते.