केवळ सूर्यकुमारच नाही, तर या खेळाडूंनीही केली आहे ‘शून्या’ची हॅट्ट्रिक, सचिनपासून झाली सुरुवात


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यांत सूर्यकुमार यादव गोल्डन डक ठरला. शून्यावर बाद झालेला सूर्यकुमार यादव हा एकमेव भारतीय खेळाडू नाही. त्याच्या आधी आणखी पाच खेळाडूंनी हे नकोसे काम केले असून त्यात सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजाचेही नाव आहे.

भारताच्या क्रिकेट इतिहासात असे सहा खेळाडू आहेत जे वनडे फॉरमॅटमध्ये सलग तीन वेळा खाते न उघडताच बाद झाले. या यादीत सूर्यकुमार हे नवीन नाव जोडले गेले आहे.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरही या विक्रमापासून चुकलेला नाही. 1994 साली मास्टर ब्लास्टमध्ये सलग तीन वनडेत शून्यावर बाद झाला होता. यामध्ये एक सामना श्रीलंकेविरुद्ध तर दोन सामने वेस्ट इंडिजविरुद्ध होते.

सूर्यकुमार यादवचा विक्रम काहीसा अनोखा आहे. या फलंदाजाने केवळ शुन्याची हॅटट्रिकच केली नाही तर गोल्डन डक्सची हॅट्ट्रिकही केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भारतीय फलंदाजासोबत असे पहिल्यांदाच घडले आहे.

2017 मध्ये, जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शून्यावर आला होता. यानंतर, 2019 मध्ये, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खाते न उघडता परतला.

2010 मध्ये, इशांत शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग होता. मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो परेराच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला जिथे तो पहिल्या दोन सामन्यात खाते उघडू शकला नाही.

2003 च्या TVS कप मॅचमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता, या मॅचमध्ये झहीर खानला इयान हर्वेने बोल्ड केले होते. यानंतर तो पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला, जिथे त्याला वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खातेही उघडता आले नाही.

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे देखील 1996 मध्ये तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सलग शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो उतरला, तेव्हा पहिल्या सामन्यातही त्याला खातेही उघडता आले नाही.