भारतीय वापरकर्ते आता ChatGPT Plus चे सदस्यत्व घेऊ शकतात. OpenAI ने ट्विट करून याची घोषणा केली आहे. प्लस सेवेद्वारे, वापरकर्ते अधिक चांगल्या आणि नवीन वैशिष्ट्यांचा वापर करण्यास सक्षम असतील. याशिवाय, जास्त मागणी असतानाही वापरकर्ते एआय चॅटबॉट वापरण्यास सक्षम असतील.
भारतात सुरु झाले ChatGPT Plus चे सबस्क्रिप्शन, दरमहा खर्च करावे लागतील एवढे पैसे
OpenAI चे ट्विट कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी रिट्विट केले आहे. याशिवाय OpenAI भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo सोबत देखील काम करत आहे.
दरम्यान, काही वापरकर्त्यांनी दावा केला आहे की चॅटजीपीटी प्लस सबस्क्रिप्शन भारतात उपलब्ध झाल्यानंतरही पेमेंटमध्ये अडचण येत आहे. याचे कारण RBI चे नवीन नियम असू शकतात, जे ऑटो-डिडक्शनला परवानगी देत नाहीत.
we ❤️ 🇮🇳 https://t.co/JJY7XksWNL
— Sam Altman (@sama) March 17, 2023
OpenAI ने फेब्रुवारीमध्ये ChatGPT प्लस सबस्क्रिप्शन लाँच केले. त्याची किंमत प्रति महिना $ 20 (सुमारे 1,650 रुपये) आहे. सध्या कंपनीने आपल्या ट्विटमध्ये भारतातील किंमतींचा उल्लेख केलेला नाही. अशा परिस्थितीत कंपनीने भारतातील किमती बदलल्या नसल्याचे मानले जात आहे. म्हणजेच युजर्सना यासाठी USD मध्ये पैसे द्यावे लागतील.
जर तुम्हाला GPT-4 तंत्रज्ञान मोफत वापरायचे असेल, तर तेही करण्याचा एक मार्ग आहे. मायक्रोसॉफ्टने नुकतेच उघड केले आहे की त्याचे बिंग चॅट GPT-4 सह चालू आहे. Bing चॅट भारतात वापरण्यासाठी मोफत आहे. त्याची अॅप आवृत्ती देखील उपलब्ध आहे.
Bing चॅट गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले. जरी पूर्वी ते केवळ मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. एका रिपोर्टनुसार, आता मायक्रोसॉफ्ट सर्व यूजर्ससाठी हे रोल आउट करत आहे. त्याचा वापर पूर्णपणे मोफत असेल.
- कोणत्याही ब्राउझरवर Bing शोध उघडा आणि वरच्या डावीकडे चॅट पर्याय शोधा.
- आता प्रतीक्षा यादीमध्ये सामील व्हा आणि मायक्रोसॉफ्ट खात्यासह लॉग इन करा.
- तुम्ही क्रोम किंवा इतर कोणत्याही ब्राउझरवर असाल तर तुम्हाला दुसऱ्या पेजवर रीडायरेक्ट केले जाऊ शकते.
- यानंतर, जर तुम्ही एजवर जाल, तेव्हा Bing चॅट GPT-4 सह सक्रिय होईल.