ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूची कारकिर्द संपुष्टात, अश्लील फोटोने उद्ध्वस्त केले सर्व काही!


बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाची धुरा सांभाळणाऱ्या टीम पेनने देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला आहे. या 38 वर्षीय खेळाडूने शेफिल्ड शील्डमध्ये क्वीन्सलँडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. सामना अनिर्णीत संपला आणि त्यानंतर टीम पेनला तस्मानियाच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. टीम पेनला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सोडावे लागले होते. अश्लील फोटोंच्या वादात अडकल्यानंतर पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही ब्रेक घेतला होता.

टीम पेनने आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत 154 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि आपल्या बॅटने 6490 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 35 अर्धशतके ठोकली. लिस्ट ए मध्ये या खेळाडूने 8 शतकांच्या मदतीने 3971 धावा केल्या.

टीम पेनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. या खेळाडूने 35 कसोटी आणि 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत. पेन टेस्टमध्ये त्याला केवळ 1534 धावा करता आल्या आणि त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतके झाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने शतकाच्या जोरावर 890 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या वादानंतर टीम पेनला कर्णधारपद मिळाले होते. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाने चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सॅन्ड पेपरचा वापर केला होता. त्यानंतर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर आणि कॅप्टन स्टीव्ह स्मिथ या तिघांवरही बंदी घालण्यात आली आणि स्मिथला कर्णधारपद सोडावे लागले. कठीण काळात टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.

मात्र, गेल्या वर्षी हा खेळाडू वादातही सापडला होता. या खेळाडूवर आरोप होता की त्याने क्रिकेट तस्मानियामध्ये काम करणाऱ्या मुलीला त्याचे घाणेरडे फोटो पाठवले होते. हे जुने प्रकरण समोर आल्यानंतर पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि आता या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला आहे.