ज्याला मानले जात होते ‘अक्षम’, तो आता ऋषभ पंतच्या जागी बनला कर्णधार, दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय


डेव्हिड वॉर्नरवर आयपीएल 2023 साठी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवले आहे. हा डावखुरा फलंदाज गेल्या वर्षीच संघात सामील झाला होता, पण या हंगामात तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे वॉर्नरकडे कर्णधारपद देण्यात आले असून ऋषभ यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. पंत 30 डिसेंबर रोजी एका रस्ता अपघातात जखमी झाला होता. दिल्लीने अक्षर पटेलला उपकर्णधार बनवले आहे.

डेव्हिड वॉर्नरला आयपीएल 2021 नंतर सनरायझर्स हैदराबादने रिलीज केले होते. वॉर्नर हैदराबादचा कर्णधार होता आणि त्यानंतर त्याला या पदावरून हटवण्यात आले. वॉर्नरने सन 2016 मध्ये सनरायझर्सला चॅम्पियन बनवले होते.

वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. या खेळाडूने गेल्या मोसमात 12 सामन्यात 48 च्या सरासरीने 432 धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट देखील 150 पेक्षा जास्त होता.

डेव्हिड वॉर्नरने 162 आयपीएल सामन्यांमध्ये 42 पेक्षा जास्त सरासरीने 5881 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 140 पेक्षा जास्त आहे आणि त्याने 4 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत.