रवींद्र जडेजाने आपले वचन पूर्ण केले, 15 मिनिटांत पूर्ण केली ऑस्ट्रेलियाच्या ‘जड्डू’ची इच्छा


भारतीय खेळाडू केवळ त्यांच्या खेळात मजबूत नाहीत. तर उलट दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात त्यांचा कोणी हात पकडू शकणार नाही. आता फक्त रवींद्र जडेजाकडेच बघा. ऑस्ट्रेलियन संघात त्याचा मोठा चाहता आहे, मॅट कुहनेमन, ज्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दिल्ली कसोटीत पदार्पण केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्याला जड्डू म्हणूनही ओळखले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा तो जडेजाला भेटला, तेव्हा त्याने त्याला गोलंदाजीच्या काही टिप्स मागितल्या.

रवींद्र जडेजाने कुहनेमनची इच्छा लगेच पूर्ण केली नाही. पण, बॉर्डर-गावसकर करंडक संपल्यानंतर त्याची मागणी निश्चितपणे पूर्ण करू, असे आश्वासन दिले. मालिका संपल्यानंतर जडेजाने आपले वचन पाळले. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या संभाषणात कुहनेमनला जडेजाकडून हव्या असलेल्या सर्व टिप्स मिळाल्या.

‘AAP’ला दिलेल्या मुलाखतीत मॅट कुहनेमनने जडेजाने पाळलेल्या वचनाबद्दल सांगितले. तो म्हणाला, आमची सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली. जडेजाने गोलंदाजीच्या काही अप्रतिम टिप्स दिल्या. आम्ही अनेक गोष्टींवर खूप बोललो.

तो पुढे म्हणाला, जडेजाला माझी, टॉड मर्फी आणि लायनची गोलंदाजी आवडली. त्याच्याकडून हे ऐकून आनंद झाला. मला त्याच्याकडून उत्तम टिप्स मिळाल्या आहेत, ज्याचा फायदा मी भारतीय उपखंडाच्या माझ्या पुढील दौऱ्यात घेऊ शकेन.

कुहनेमनने जडेजाने पाळलेल्या वचनाबद्दल तर सांगितलेच, पण त्याच्या स्वभावाचे कौतुकही केले. तो म्हणाला, तो एक चैतन्यशील व्यक्ती आहे, जो नेहमी मदतीसाठी तयार असतो. तो मला इन्स्टाग्रामवर मेसेजही करतो.

दरम्यान कुहनेमनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 3 कसोटी सामने खेळून 9 विकेट घेतल्या, ज्यात इंदूर कसोटीत 5/16 च्या मॅच-विनिंग कामगिरीचा समावेश आहे.