आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू पडला प्रेसिडेंटच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे कॅमेरून ग्रीनची गर्लफ्रेंड


कॅमेरून ग्रीन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये दिसणार आहे. तो या लीगमध्ये चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. मैदानात उतरण्यापूर्वीच ग्रीनने धमाका केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएलचे काउंटडाऊन सुरू होताच ग्रीनची गर्लफ्रेंड एमिली रेडवूडच्या चर्चेलाही जोर आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या किमतीची चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे त्याच्या लव्हस्टोरीचीही चर्चा आहे.

ग्रीनची मैत्रीण एमिली रेडवुड एक पोषणतज्ञ आहे. तिला प्रवासाचीही खूप आवड आहे. तिला वेळ मिळताच ती कॅमेरून ग्रीनसोबत फिरायला बाहेर पडते.

रेडवुड 2021 मध्ये कर्टिन विद्यापीठाची प्रेसिडेंटही राहिली आहे. ती ग्लुटेन फ्री आहार घेते. मजबुरीमुळे तिला हे करावे लागत आहे. खरं तर, 2016 मध्ये तिला सेलियाक नावाचा आजार झाला होता.

सेलिआक रोग असलेले लोक ग्लूटेनच्या संपर्कात आले, तर त्यांच्या आतड्यांमध्ये सूज येते. या कारणास्तव, ग्रीनच्या मैत्रिणीला ग्लूटेन मुक्त आहार घ्यावा लागतो.