विराट कोहली, सचिन तेंडुलकर हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नाहीत. कमाईच्या बाबतीत, ते 15 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या महान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टपेक्षा खाली आहेत. गिलख्रिस्टला निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली, तरीही त्याच्यावर पैशांचा पाऊस पडत आहे. गिलख्रिस्ट हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली त्याच्यापेक्षा खूप मागे आहेत. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा जगातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे आणि गिलख्रिस्टची एकूण संपत्ती त्याच्या दुप्पट आहे.
विराट-सचिन नव्हे, तर 15 वर्षांपूर्वी निवृत्त झालेला खेळाडू आहे सर्वात श्रीमंत क्रिकेटर, कमावले 3100 कोटी
गिलख्रिस्ट 2023 चा सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. त्यांची एकूण संपत्ती 31 अब्ज रुपये म्हणजेच 3100 कोटींच्या जवळपास आहे. तर सचिनची एकूण संपत्ती 14 अब्ज रुपये म्हणजेच 1400 कोटी रुपये आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची एकूण संपत्ती 11 अब्ज आहे.
महान यष्टिरक्षक गिलख्रिस्टने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, परंतु निवृत्तीच्या अनेक वर्षांनंतरही त्याची एकूण संपत्ती झपाट्याने वाढत आहे. त्यांची मासिक कमाई 5.50 कोटींच्या जवळपास आहे.
गिलख्रिस्टच्या निव्वळ संपत्तीचा मोठा भाग हा आयपीएलच्या कमाईचाही होता. तो 2 फ्रँचायझींचा भाग होता आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने एकूण 22 कोटी 94 हजार 85000 हजार रुपये कमावले.
गिलख्रिस्टचे ऑस्ट्रेलियात एक अतिशय आलिशान डिझायनर घर आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हरसह अनेक आलिशान गाड्या आहेत. गिलख्रिस्टची संपत्ती वाढवण्यात रिअल इस्टेटचा सर्वात मोठा वाटा आहे. देशभरात त्यांच्या अनेक स्थावर मालमत्ता आहेत.