बेन स्टोक्सवर चोट्यांनी केला हात साफ, रेल्वे स्टेशनवरून पळवली बॅग, जाणून घ्या किती झाले नुकसान?


IPL 2023 पूर्वी बेन स्टोक्स एका मोठ्या घटनेचा बळी ठरला आहे. त्याची फसवणूक करून त्याला लुटले आहे. चोरट्यांनी त्याच्याकडील सामान व बॅग पळवून नेली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारासोबत रेल्वे स्टेशनवर हा प्रकार घडला आहे. पण हा प्रकार भारत घडला नसून त्याच्याच देशातील एका रेल्वे स्टेशनवर घडला आहे, ज्याची माहिती स्वतः बेन स्टोक्सने ट्विट करून दिली आहे.

बेन स्टोक्ससोबत चोरीची घटना लंडनमधील किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवर घडली, त्यानंतर तो थोडा अस्वस्थ दिसत होता. सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करताना त्याने लिहिले की, ज्याने किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवर माझी बॅग चोरली, मला आशा आहे की त्याच्याकडे माझे कपडे नसतील.

मात्र, या चोरीत स्टोक्सचे एकूण किती नुकसान झाले हे सध्या स्पष्ट झालेले नाही. दरम्यान बेन स्टोक्स लवकरच आयपीएल 2023 मध्ये खेळण्यासाठी भारतात येणार आहे, ज्यामध्ये 16.25 कोटी रुपये खर्च करून चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आहे. संपूर्ण हंगामासाठी स्टोक्स सीएसकेसाठी उपलब्ध असेल अशी बातमी आहे. संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना बीसीसीआयकडून असेच आश्वासन मिळाले आहे की या हंगामात इंग्लिश खेळाडूंची पूर्ण उपलब्धता असेल.

31 वर्षीय बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका 3-0 ने जिंकली होती, तर त्यांना न्यूझीलंडमध्ये बरोबरीत खेळावे लागले होते. इंग्लंडला टी-20 चॅम्पियन बनवण्यात स्टोक्सनेही आपली भूमिका बजावली आहे. स्टोक्स फॉर्मात आहे पण त्याच्या फिटनेसबाबतही तो संघर्ष करत आहे. यामुळेच त्याच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्यावर सस्पेन्सची टांगती तलवार आहे.