कोरोनासारखा कहर करेल का H3N2 ? नीती आयोगाने का सांगितले औषध आणि ऑक्सिजन तयार ठेवण्यास?


H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, नीती आयोगाने इन्फ्लूएंझा हाताळण्यासाठी कृती कार्य दल तयार करण्यासाठी बैठक घेतली आहे. आयोगाच्या बैठकीत, राज्यांना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये सज्जता, मनुष्यबळ, औषध, वैद्यकीय ऑक्सिजन आणि उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. आयोगाने निर्णय घेतला आहे की, विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे.

लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली जातील, यावर नीती आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली. इन्फ्लूएंझा विषाणूचा सामना करण्यासाठी आयोगाने कोरोनासारख्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात राज्यांनाही सूचना जारी केल्या जातील. आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. नाक व तोंड झाकणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, लक्षणे असलेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका आणि लक्षणे आढळल्यास चाचणी घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

भारतात हंगामी फ्लूमुळे दोन मृत्यू झाले आहेत. कर्नाटकात एक तर हरियाणामध्ये एक मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते आणि प्रकरणांमध्ये वाढ होत असताना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 2 जानेवारी ते 5 मार्चपर्यंत देशात H3N2 चे 451 रुग्ण आढळले आहेत.

गेल्या तीन महिन्यांत H3N2 चे 90 रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, कर्नाटकमध्ये 82 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, जो त्याच विषाणूने ग्रस्त होता. त्याला 24 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 1 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. एक नमुना तपासणीसाठी पाठवला होता, ज्याच्या अहवालात 6 मार्च रोजी त्याला व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली. त्याच वेळी, हरियाणामध्ये देखील H3N2 विषाणूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.