भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. अहमदाबाद कसोटी जिंकून मालिका काबीज करण्याबरोबरच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याकडे भारताचे लक्ष आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होत आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि इशान किशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित हात उचलून इशानला धमकावताना दिसत आहे. वास्तविक या सामन्यात ईशान भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही.
इशान किशनने पाण्याची बाटली खाली सोडताच रोहित शर्माने उचलला हात
चौथ्या कसोटीचा पहिला दिवस आहे. दुसऱ्या सत्रात इशान किशन आपल्या संघासाठी पाण्याची बाटली घेऊन मैदानावर आला. रोहितने पाणी पिऊन बाटली भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला परत केली. ईशान जरा घाईत होता आणि या घाईमुळे त्याने बाटली खाली टाकली. यानंतर रोहितने त्याला मजेदार पद्धतीने घाबरवले.
चौथ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पाहुण्या संघाने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतक झळकावले. ख्वाजाच्या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 225 धावा केल्या होत्या. ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी भारतीय हल्ल्याचे सर्व नियोजन उद्ध्वस्त केले होते.
अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅमेरून ग्रीननेही शतक झळकावले. त्याचवेळी ख्वाजाने दीडशे धावांचा पल्ला गाठला. ग्रीनने आपल्या धडाकेबाज खेळीत 18 चौकार मारले. आतापर्यंत केवळ मोहम्मद शमी, आर अश्विन, रवींद्र जडेजा यांनाच यश मिळाले. उमेश यादव, अक्षर पटेल खाते उघडण्यासाठी सतत धडपडत आहेत.