ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘दुर्दैवी एक्सिडेंट’चा बळी, डोक्यावर उटला चेंडूचा वळ


आपल्या फिरकीने फलंदाजांना अडचणीत आणणारा नॅथन लायन अहमदाबाद कसोटीत मोठ्या अडचणीत सापडला. खरे तर फलंदाजीदरम्यान चेंडू नॅथन लायनच्या हेल्मेटला लागला. 145 व्या षटकात चेंडू नॅथन लायनच्या हेल्मेटला लागला. मोठी गोष्ट म्हणजे हा चेंडू इतका वेगवान होता की लायनला तो समजू शकला नाही. चेंडू थेट लायनच्या हेल्मेटवर आदळला. अंपायरने तात्काळ फिजिओला बोलावले आणि जेव्हा लायनचे हेल्मेट उघडले, तेव्हा बघणारे थक्क झाले. कारण लायनच्या डोक्यावर चेंडूची खूण छापलेली होती.

नॅथन लायनला चेंडू लागल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, मोठी गोष्ट म्हणजे या चेंडूचा सामना करूनही हा खेळाडू विकेटवरच राहिला आणि 50 पेक्षा जास्त चेंडू खेळले.

अहमदाबाद कसोटीत नॅथन लायन टीम इंडियासाठी मोठा धोका असेल. अहमदाबादमध्ये भारतीय फिरकीपटूंना विकेटची मदत मिळाली नसली तरी खेळाच्या तिसऱ्या दिवशी फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळू शकते. याचा फायदा नॅथन लायन घेऊ शकतो. नॅथनने इंदूर कसोटीच्या दुसऱ्या डावात 8 विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियाचे फलंदाज त्याच्यासमोर असहाय दिसत होते. आता अहमदाबादमध्ये ते लायनचा कसा सामना करतात, हे पाहावे लागेल.

तसे पाहता अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत आहे. या संघाने 400 धावांचा टप्पा पार केला आणि यासह भारतीय संघ बॅकफूटवर आला. आता ही कसोटी जिंकणे भारतासाठी सोपे नसेल. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा हिरो ठरला उस्मान ख्वाजा, ज्याने 180 धावा केल्या. मात्र, या खेळाडूचे द्विशतक हुकले. कॅमेरून ग्रीननेही शानदार शतक झळकावताना 114 धावांची खेळी खेळली.