आजकाल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रंगत असलेला एखादा फलंदाज असेल तर तो म्हणजे एडन मार्कराम. SA20 लीगमध्ये आपल्या संघाला चॅम्पियन बनवणारा मार्कराम सतत धावा करत आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही चमक दाखवत आहे. पहिल्या कसोटीतील शानदार शतकानंतर मार्करामने दुसऱ्या कसोटीतही जबरदस्त खेळी केली.
8 दिवसांपूर्वी ठोकले शतक, नंतर मिळाले संघाचे कर्णधारपद, आता नशिबाने मारली पलटी
बुधवार, 8 मार्चपासून जोहान्सबर्ग येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर मार्करामने वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली आणि संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, या वेळी नशिबाने त्याला झटका दिला आणि तो शतकाच्या जवळ पोहोचू शकला नाही.
8 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारीला पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मार्करामने शानदार शतक झळकावले होते. आता त्याला सलग दुसरे शतक झळकावण्याची संधी होती, पण दुसऱ्या सत्रात 96 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर त्याला गुडकेश मोतीने बाद केले. मार्करामने आपल्या खेळीत 139 चेंडू खेळले आणि 17 चौकार मारले.
पहिल्या कसोटी सामन्यात 115 आणि 47 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर अलीकडेच त्याची दक्षिण आफ्रिकेच्या T20 संघाचा नवा कर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली.
मार्करामने या डावात डीन एल्गर (42) सोबत पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने टोनी डिजॉर्जसोबत दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली.