सतीश कौशिक यांचे शेवटचे ट्विट… एक दिवसापूर्वीच खेळली होती मित्रांसोबत होळी


बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. कौशिक 66 वर्षांचे होते आणि बॉलिवूडमध्ये त्यांची एक वेगळी ओळख होती. अभिनेते अनुपम खेर यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करून कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की 45 वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम लागेल.

गुरुवारी सकाळी ट्विट करत अनुपम खेर म्हणाले, ‘मला माहित आहे की मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही. ओम शांती!

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता त्यांचे शेवटचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतीश कौशिक यांनी मंगळवारी रात्री उशिरा होळीसंदर्भात एक ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. या ट्विटनंतर तब्बल 24 तासांनंतर सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला आहे.


सतीश कौशिक यांनीही आपल्या ट्विटमध्ये अनेक फोटो शेअर केले होते. प्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तरही त्यातल्या एका फोटोत दिसत आहेत. दुसऱ्या छायाचित्रात अली फजल आणि रिचा चढ्ढा देखील दिसत आहेत. याशिवाय बॉलीवूडचे इतर अनेक कलाकारही दिसत आहेत. सतीश कौशिक यांच्या या शेवटच्या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सही दु:ख व्यक्त करत आहेत. होळीच्या दिवशी सतीश कौशिक यांनी केलेले ट्विट हे त्यांचे शेवटचे ट्विट असेल याची कुणालाही कल्पना नव्हती.

सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये आलेल्या ‘जाने भी दो यारों’ चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत कौशिशने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्यासोबतच कौशिकने दिग्दर्शक म्हणूनही काम केले आणि अनेक चित्रपट केले. सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या निधनाने सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मधुर भांडारकर, कंगना राणौतसह अनेक स्टार्सनी कौशिकच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.