कसा झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, कुठे आणि काय करत होते? सत्य आले समोर


आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने बॉलिवूडमध्ये मोठा ठसा उमटवणारे सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, सतीश कौशिक होळी खेळतानाचे अनेक आश्चर्यकारक फोटो समोर आले होते, ज्यामध्ये ते खूप आनंदी दिसत होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, सतीश कौशिक हरियाणातील गुरुग्राममध्ये आले होते. येथे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. ज्यावेळी त्यांची प्रकृती खालावली, त्यावेळी ते कारमध्येच होते, असे सांगण्यात येत आहे. घाईघाईत त्यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही.

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात सकाळी 11 वाजता त्यांचे शवविच्छेदन होणार आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या दीनदयाळ रुग्णालयातच ठेवण्यात आला आहे.