कोट्यावधींची कमाई, या आहेत जगातील 5 सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर


महिला क्रिकेट झपाट्याने प्रगती करत आहे. महिला क्रिकेटपटूही पंख पसरवत आहेत. उड्डाण करत आहेत. महिला क्रिकेटपटू खेळाच्या बाबतीत आणि कमाईच्या बाबतीतही कुणापेक्षा कमी नाहीत. भारतीय महिला क्रिकेटपटूही जगाला आपली ताकद दाखवत आहेत. जगातील 5 श्रीमंत महिला क्रिकेटपटूंमध्येही 3 भारतीय आहेत.

जेव्हा सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटरचा विचार केला जातो, तेव्हा सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅलिस पॅरीचे. पॅरीचे सौंदर्य आणि तिच्या खेळाची अनेकदा चर्चा होते. तिची एकूण संपत्ती 1 अब्ज 14 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग ही दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 73 कोटींच्या जवळपास आहे. तिने अलीकडेच ऑस्ट्रेलियाला T20 क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनवले.

भारताची दिग्गज माजी कर्णधार मिताली राज ही जगातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 41 कोटींहून अधिक आहे. मितालीने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

स्मृती मंधाना ही जगातील चौथी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. त्यांची एकूण संपत्ती 34 कोटींच्या जवळपास आहे. मंधाना ही महिला प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला 3.4 कोटी रुपयांना खरेदी केले.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ही जगातील 5वी श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 24 कोटींहून अधिक आहे. हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.8 कोटी रुपयांना विकत घेतले.