Metro Card Recharge : आता व्हॉट्सअॅपवरून रिचार्ज होणार मेट्रो कार्ड, घरबसल्या करावे लागणार हे काम


देशभरातील मेट्रोने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन नवनवीन बदल करत असते. मेट्रोमध्ये प्रवास करताना, मेट्रो कार्ड रिचार्ज आणि टोकन मिळण्याची सर्वात मोठी समस्या असते. गर्दीमुळे लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. पण, आता तुमची यातून सुटका होणार आहे, कारण आता तुम्ही फक्त व्हॉट्सअॅपवरूनच मेट्रो तिकीट बुक, रिचार्ज किंवा रद्द करू शकणार आहात. मात्र, देशातील केवळ चार शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या सुविधेद्वारे तुम्ही मेट्रोच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे मेट्रोच्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मवर ट्रान्झिट सोल्यूशन्स आणण्यासाठी WhatsApp ने भारतीय शहरांमधील मेट्रो रेल्वे सेवा प्रदात्यांसोबत भागीदारी केली आहे. वापरकर्ते आता रांगेत उभे राहण्याचा त्रास न होता व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे तिकिटे सहजपणे बुक करू शकतील, खरेदी करू शकतील, रद्द करू शकतील किंवा रिचार्ज करू शकतील. याशिवाय तुम्हाला मेट्रोचे टाइम टेबल, रूट मॅप, भाडे आणि इतर माहितीही मिळू शकेल.

सध्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटची सुविधा फक्त 4 शहरांमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे मेट्रोचा समावेश आहे. या चार शहरांतील युजर्स व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे चॅट करू शकतात.

बेंगळुरूमध्ये राहणारे लोक, चॅटबॉट सक्रिय करण्यासाठी https://wa.me/+918105556677 या लिंकवर क्लिक करा आणि हाय लिहून संदेश पाठवा. एकदा बॉट सक्रिय झाल्यानंतर, तुम्हाला ई-तिकीट बुक करण्यासाठी एक URL मिळेल. मुंबईत ऑटोमेटेड फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर ई-तिकिटांची पडताळणी करावी लागेल. तर, पुणे आणि हैदराबादसाठी तुम्हाला https://wa.me/+918105556677 वर हाय पाठवावे लागेल.

असे रिचार्ज करा मेट्रो कार्ड

  • मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट www.dmrcsmartcard.com ला भेट द्या.
  • तुमची मेट्रो कार्ड माहिती एंटर करा.
  • तुम्हाला कार्ड रिचार्ज करायचे असलेल्या रुपयांच्या रकमेसाठी पर्याय निवडा.
  • यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.
  • एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि पेमेंट मोड निवडा.
  • पेमेंटसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग पर्यायावर क्लिक करा.
  • कार्डचे तपशील भरल्यानंतर, Pay Now वर क्लिक करा आणि तुमचे कार्ड रिचार्ज होईल.