अहमदाबादमध्ये मोडणार अनिल कुंबळेचा सर्वात मोठा विक्रम, इतिहास रचण्यासाठी आर अश्विन सज्ज!


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. अहमदाबादमधील सामन्यासह मालिका काबीज करण्यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील प्रवेशाकडेही त्याचे लक्ष लागले आहे. पण यात अहमदाबादमध्ये सर्वांच्या नजरा आर अश्विनवर असतील.

भारताचा स्टार गोलंदाज अश्विन चौथ्या कसोटीत महान भारतीय गोलंदाज अनिल कुंबळेचा सर्वात मोठा विक्रम मोडू शकतो. कुंबळेचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी अश्विनला चौथ्या कसोटीत किमान 5 बळी घ्यावे लागतील.

अश्विनने ही कामगिरी केली, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम कुंबळेच्या नावावर आहे.

अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 111 विकेट घेतल्या. तर आर अश्विन 107 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांशिवाय इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाने या संघाविरुद्ध 100 पेक्षा जास्त बळी घेतले नाहीत.

याशिवाय कुंबळे आणि अश्विन या दोघांच्या नावावर मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये 25-25 पाच बळी घेण्याचा विक्रम आहे. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी 5 विकेट्स घेणारा अश्विन कुंबळेला मागे टाकणार आहे.