सानिया मिर्झाच्या पार्टीतून शोएब मलिक गायब, या स्टार्सनी सजवली पार्टी


भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने रविवारी हैदराबादमध्ये आपल्या कारकिर्दीला अखेरचा निरोप दिला. तिने दिवसा कोर्टवर प्रदर्शनीय सामना खेळला आणि रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य पार्टी आयोजित केली. या पार्टीत अनेक मोठे अभिनेते, क्रिकेटर आणि खेळाडू सहभागी होण्यासाठी आले होते, मात्र सानियाचा पती शोएब मलिक दिसला नाही.

पार्टीत सानिया मिर्झाचा मुलगा इझान आणि आई-वडील सोबत होते. तर सानियाची धाकटी बहीण अनम मिर्झा पती असद आणि माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत येथे पोहोचली. अझरुद्दीन हा अनम मिर्झाचा सासरा आहे. सानियाने संपूर्ण कुटुंबासोबत फोटोसाठी पोज दिली पण शोएब मलिकच्या अनुपस्थितीमुळे चाहते थोडे आश्चर्यचकित झाले. शोएब दिवसभरात फेअरवेल मॅचमध्येही दिसला नाही.

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालही तिचा पती आणि सहकारी खेळाडू पारुपल्ली कश्यपसोबत पार्टीत पोहोचली. गुलाबी गाऊनमध्ये सायना खूपच सुंदर दिसत होती. तर कश्यप औपचारिक अवतारात दिसला.

यावेळी माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाणही पत्नी आणि मुलांसह दिसला. दिवसभरात फेअरवेल मॅच पाहण्यासाठी आलेल्या युवराज सिंगनेही या पार्टीला हजेरी लावली, तो यानिमित्त खास हैदराबादला पोहोचला होता.

ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमानही सानियाच्या निवृत्तीच्या पार्टीला उजाळा देण्यासाठी आले होते. या पार्टीत त्यांनी अनेक सेल्फी घेतले आणि सोशल मीडियावर शेअरही केले.

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हटला जाणारा महेश बाबूही पत्नी नम्रता शिरोडकरसोबत या पार्टीत पोहोचला. दोघेही काळ्या कपड्यात जुळलेले दिसले. नमृताने काळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता, तर महेश बाबूही काळ्या शर्टमध्ये दिसला.