पसरत आहे फ्लू, धोकादायक नाही परिस्थिती, अँटीबायोटिक्सवर डॉक्टरांच्या सल्ल्याचे करा अनुसरण


भारतात, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सततचा खोकला आणि काही प्रकरणांमध्ये तापासोबत खोकला येण्याचे कारण म्हणजे इन्फ्लूएंझा A चा H3N2 उपप्रकार. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशभरात खोकला, सर्दी आणि मळमळण्याच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्सच्या अतिवापराविरोधात इशारा दिला आहे. हंगामी ताप पाच ते सात दिवस राहणार असल्याचे आयएमएने म्हटले आहे. IMA च्या स्थायी समितीने सांगितले की ताप तीन दिवसांत संपेल, परंतु खोकला तीन आठवडे टिकू शकतो.

फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, डॉक्टर आणि तज्ञांनी म्हटले आहे की ही स्थिती धोकादायक नाही आणि तापमानातील बदल यासाठी जबाबदार आहे. IMA ने प्रतिजैविक घेण्याची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे, कारण यामुळे प्रतिजैविक-प्रतिरोधकता निर्माण होऊ शकते आणि ताप आणि फ्लू सारखी लक्षणे कायम राहतात.

त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पसरलेले H3N2 हे इतर उपप्रकारांच्या तुलनेत रूग्णांच्या हॉस्पिटलायझेशनचे एक प्रमुख कारण आहे. ICMR त्याच्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज नेटवर्कद्वारे श्वसन विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांनी लोकांना व्हायरसपासून वाचवण्यासाठी एक यादी जारी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगितले आहे.

असोसिएशनने सांगितले की काही प्रकरणांमध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि जुलाबाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. संसर्ग साधारणपणे पाच ते सात दिवस टिकतो. ताप तीन दिवसांनी निघून जातो, परंतु खोकला तीन आठवडे टिकू शकतो.

सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिन एम्सचे प्रोफेसर डॉ. संजय राय म्हणाले की, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. हा फ्लूचा हंगाम आहे, कारण हवामान जीवाणूंना जगण्यासाठी अनुकूल आहे. ही काही नवीन घटना नाही. उन्हाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यात असे रुग्ण वाढतात आणि विषाणूजन्य आजार होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही