IND vs AUS : 11 धावात माघारी परतले 6 ऑस्ट्रेलियन, 88 धावांची आघाडी, जडेजाच्या पाठोपाठ उमेश आणि अश्विनचा कहर


इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 197 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे त्यांना भारताविरुद्ध 88 धावांची आघाडी मिळाली. भारताने पहिल्या डावात केवळ 109 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची मोठी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी अवघ्या 11 धावांच्या अंतराने 6 विकेट्स गमावल्या.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 4 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी तो यापुढे खेळायला गेला तेव्हा 186 धावा होईपर्यंत त्याच्या फक्त 4 विकेट्स शिल्लक होत्या. पण एकदा या धावसंख्येवर हँड्सकॉम्ब आणि कॅमेरून ग्रीनची जोडी तुटली, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव चुटकीसरशी संपुष्टात आला. आधी हँड्सकॉम्ब, मग कॅमेरून ग्रीन आणि मग एक-एक करून सगळे गेले.

पहिल्या दिवशी एकट्या रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या दिवशी अश्विन आणि उमेश यादवने मिळून कांगारूंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचे काम केले. दोघांनी मिळून 3-3 विकेट्स घेतल्या. प्रथम अश्विनने पीटर हँड्सकॉम्बला, नंतर उमेश यादवने कॅमेरून ग्रीनला एलबीडब्ल्यू केले.

उमेश यादवने मिचेल स्टार्कला बोल्ड केले आणि अश्विनने अॅलेक्स कॅरीला एलबीडब्ल्यू करून ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. यानंतर टॉड मर्फीला उमेश यादवने क्लीन बोल्ड केले आणि नॅथन लायनला अश्विनने बोल्ड केले.

मात्र, इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने 197 धावा केल्या आणि 88 धावांची आघाडी घेतली. भारताला इथून आपल्या बाजूने मुकाबला करायचा असेल, तर भक्कम फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीवर मात करेपर्यंत विकेट पडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावे लागतील. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला किमान 250 धावांचे लक्ष्य देण्याबाबत भारताला विचार करावा लागणार आहे.