आर अश्विन ठरला नंबर 1 कसोटी गोलंदाज, एका आठवड्यात जेम्स अँडरसनकडून हिसकावले अव्वल स्थान


टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर आर अश्विन हा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत आर अश्विनने हे स्थान गाठले.

अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकले. अँडरसन गेल्या आठवड्यातच पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता, मात्र आता अश्विनने त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

आर अश्विन 864 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आणि जेम्स अँडरसनचे 859 रेटिंग गुण आहेत. आर अश्विन 2015 मध्ये प्रथमच नंबर 1 कसोटी गोलंदाज बनला होता. 2016 मध्येही त्याने हे स्थान कायम ठेवले होते.

अश्विनशिवाय दोन भारतीय गोलंदाजांनी आयसीसी क्रमवारीत छाप पाडली आहे. जसप्रीत बुमराह चौथ्या तर रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर पोहोचला आहे. दोघेही प्रत्येकी एक स्थानावर आले आहेत.

दरम्याम कसोटी अष्टपैलूंच्या यादीत आर अश्विनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाची हुकूमत पहिल्या स्थानावर कायम आहे.