आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात सर्वात जलद शतक, दोनदा निवृत्तीनंतर पुनरागमन, त्यानंतर खेळला विश्वचषक


पदार्पणाच्या सामन्यात सर्वात वेगवान शतक झळकावणारा पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आज 47 वर्षांचा झाला आहे. 1 मार्च 1975 रोजी जन्मलेल्या आफ्रिदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ लोटला असेल, परंतु जगभरातील T10 आणि T20 लीगमध्ये त्याची ताकद अजूनही दिसून येते.

आफ्रिदीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात झंझावाती पद्धतीने केली. त्याने 1996 मध्ये केनियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला डाव श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात खेळला.

आफ्रिदीने पहिल्याच डावात धुमाकूळ घातला. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक झळकावले. त्यावेळी हे वनडेतील सर्वात वेगवान शतक होते. यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

त्याच्या नावावर 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8064 धावा आणि 395 बळी, 27 कसोटी सामन्यात 1716 धावा आणि 48 बळी आणि 99 टी-20 सामन्यात 1416 धावा आणि 98 विकेट आहेत.

आफ्रिदीने दोनदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2006 मध्ये तो पहिल्यांदा निवृत्त झाला, पण 2010 मध्ये तो कर्णधार म्हणून कसोटी संघात परतला. त्यानंतर 2011 च्या विश्वचषकानंतर निवृत्त झाला, परंतु काही महिन्यांनंतर पुन्हा परतला आणि 2015 एकदिवसीय विश्वचषक आणि 2016 टी-20 विश्वचषक खेळला. तो 2018 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.