जिओ कंपनी आपल्या वापरकर्त्यांना दीर्घ वैधता योजना ऑफर करते. या योजनांमध्ये सहामाही आणि त्रैमासिक योजनांपेक्षा अधिक फायदे दिले जातात. तसेच, या योजनेची किंमत देखील कमी आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या रिचार्जवर तुम्हाला एक महिन्याचा फ्री रिचार्ज दिला जात आहे. दरम्यान हा वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे, जो 2879 रुपयांचा आहे.
Jio देत आहे एक महिन्याचा फ्री रिचार्ज! डेटा आणि कॉलिंग सर्व मोफत, असा घ्या फायदा
या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS सुविधा देखील उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. हे सर्व फायदे 719 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये दिले जातात. पण Jio च्या 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता ऑफर दिली जाते. जर तुम्ही 719 चा रिचार्ज प्लान चार वेळा रिचार्ज केला तर एकूण 2876 रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 336 दिवसांची वैधता मिळेल. तर 2879 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एक वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची वैधता मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला जिओच्या 719 प्लॅनमध्ये एकूण 29 दिवसांची अधिक वैधता मिळेल.
तर गोष्ट अशी आहे की जर तुम्ही 2976 रुपयांचा रिचार्ज केला, तर तुम्हाला 3 रुपये अधिक द्यावे लागतील. पण तुम्हाला एक महिन्याचा रिचार्ज प्लॅन मोफत मिळेल. या दरम्यान तुम्ही डेटा आणि कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.