शार्दुल ठाकूर धरणार मितालीचा हात, लग्न पुढे ढकलल्यानंतर बदलले गोव्याचे नियोजन


केएल राहुल, अक्षर पटेल यांच्यानंतर आता शार्दुल ठाकूरही अखेर लग्नबंधनात अडकणार आहे. भारतीय अष्टपैलू शार्दुल 27 फेब्रुवारी रोजी बेकरी व्यवसाय करणाऱ्या मिताली परुलकरचा हात धरणार आहे. शार्दुल आणि मिताली यांची नोव्हेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली होती.

शार्दुल आणि मिताली फार पूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकणार होते. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न पुढे ढकलले गेले. एवढेच नाही तर त्याला गोव्यातील डेस्टिनेशन वेडिंगचे प्लॅनिंग सोडावे लागले.

वास्तविक, या जोडप्याला गोव्यात लग्न करायचे होते, पण ये-जा करताना येणाऱ्या अडचणींमुळे दोघांनी मुंबईजवळ लग्न करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय स्टार शार्दुलची भावी पत्नी मितालीबद्दल सांगायचे तर तिने मॉडेलिंगही केले आहे. एवढेच नाही, तर तिने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे.

शार्दुल ठाकूर आणि मितालीच्या लग्नात जवळपास 200 ते 250 पाहुणे उपस्थित राहणार असल्याची बातमी आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिताली तिच्या लग्नाचा केक देखील बनवणार आहे.