हॅरी ब्रूक: मोठी भागीदारी, सर्वोच्च सरासरी, 4.5 तासांत मोडले 4 मोठे विक्रम


न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत हॅरी ब्रूकचे द्विशतक हुकले. त्याने 186 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. ब्रूकने आपल्या झंझावाती खेळीत 24 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने सुमारे साडेचार तास फलंदाजी केली आणि यासोबतच विनोद कांबळीचा 30 वर्ष जुना विक्रमही मोडला. पहिल्या 9 कसोटी डावात सर्वाधिक 809 धावा करणारा ब्रूक जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

ब्रूकने विनोद कांबळीचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला. कांबळीने आपल्या पहिल्या 9 कसोटी डावात 798 धावा केल्या होत्या आणि हा विक्रम बराच काळ त्याच्या नावावर होता, जो आता ब्रूकच्या नावावर आहे.

एवढेच नाही तर पहिल्या 9 कसोटी डावात 800 धावांचा टप्पा पार करणारा हॅरी ब्रूक क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

सर्वोच्च सरासरीच्या बाबतीत त्याने डॉन ब्रॅडमनलाही मागे टाकले. किमान 800 कसोटी धावांच्या बाबतीत त्याची सरासरी ब्रॅडमनपेक्षा जास्त आहे. ब्रूकची कसोटी सरासरी 100.87 होती, तर ब्रॅडमनची सरासरी 99.94 होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ब्रूक आणि जो रूट यांच्यात 302 धावांची भागीदारी झाली होती. 30 धावांपूर्वी 3 विकेट पडल्यानंतर ही परदेशी भूमीवरील सर्वात मोठी भागीदारी आहे.