Urfi Javed : ‘बापाने शिव्या घातल्या, आईने मारले’, जीव देणार होती उर्फी


उर्फी जावेद आज खूप स्वतंत्र विचाराची आहे. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती चर्चेत असते. याशिवाय तिच्या आउटफिटमुळे ती सोशल मीडियावर ट्रोलरच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेदने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. या दरम्यान तिने तिचे पालनपोषण कसे झाले ते सांगितले. याशिवाय तिने वडिलांच्या कठोरतेबद्दलही सांगितले. तुम्ही उर्फीला बहुतेक वेळा कॅमेऱ्यासमोर हसताना पाहिले असेल. पण पहिल्यांदाच अभिनेत्री तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल बोलली आणि भावूक दिसली.

उर्फीने डर्टी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती लखनऊमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिच्या पालकांना पाच मुले होती ज्यात ती दुसरी होती. तिचे वडील तिला मारहाण करून शिवीगाळ करायचे. तिची आईही तिला मारहाण करायची. हे सगळं रोज ऐकावं लागायचं. मी आत्महत्येचा प्रयत्नही केला. मी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. माझे वडील प्रत्येक गोष्टीत बंधने घालायचे. पण त्यावेळी मी टीव्ही जास्त बघायचे. फॅशनकडे माझा नेहमीच कल राहिला आहे. मला फॅशनची फारशी समज नव्हती पण मला काय घालायचे हे माहित होते. मला वेगळे उभे राहायचे होते. मी पार्टीला जायचे, तेव्हा लोक माझ्याकडे निरखुन बघायचे.

उर्फीने मुलाखतीत पुढे सांगितले की, तिला नेहमी पैशाची काळजी होती. ती मोठी होत असताना तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. पण माझ्या मनात श्रीमंत मुलीचे स्वप्न फुलायचे. स्त्रीने पुरुषाच्या मागे न धावता पैशाच्या मागे धावावे अशी तिची विचारधारा होती.

उर्फी जावेदला पहिल्यांदा करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी शोमधून लोकप्रियता मिळाली. यामध्ये ती बाहेर पडणारी पहिली स्पर्धक होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर ती खूप रडली. तेव्हापासून ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली असून तिचे फोटो एकापाठोपाठ व्हायरल होत आहेत. यामुळे लोक तिला खूप ट्रोल करत आहेत. पण ती तिच्या सुरात मग्न राहते. ही तिची खासियत आहे.