अदानींच्या 63,72,05,80,00,000 रुपयांची राख रांगोळी, आता पुढे काय?


आजपासून बरोबर एक महिना आधी म्हणजेच 23 जानेवारीला गौतम अदानी यांनी विचार केला नसेल की 1 महिन्यात फक्त 1 अहवाल त्यांच्या कंपन्यांना असे करेल. गेल्या एक महिन्यापासून अदानी ग्रुप आणि खुद्द गौतम अदानी हेडलाईनमध्ये आहेत, पण कोणत्याही चांगल्या बातमीमुळे नव्हे तर विनाशामुळे. 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग अहवाल आल्यापासून अदानीच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे आणि कंपनीचे प्रमुख समभाग 80 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांनी या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. या दरम्यान अदानी 77 अब्ज डॉलर्स (63,72,05,80,00,000 रुपये) गमावले आहे. एक काळ होता, जेव्हा ते संपत्ती कमवण्यात नंबर वन असायचे, आता संपत्ती गमावण्यातही ते नंबर वन झाले आहेत.

अदानी यांच्या संपत्तीत तर प्रचंड घट होत आहेच, पण त्याचबरोबर समूहाला 11 लाख कोटींचे नुकसानही झाले आहे. अमेरिकन रिसर्च हाऊस हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर जोरदार टीका झाली आहे. हा अहवाल 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासून अदानी समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 11 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

गौतम अदानी यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, सोमवारी, अदानी यांची संपत्ती अनेक वर्षांमध्ये प्रथमच 50 अब्ज डॉलरच्या खाली गेली, ज्यामुळे फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोन्ही रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत ते जगातील पंचविसाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आणि आता ते 29 व्या स्थानावर आले आहेत.

गौतम अदानी आणि अदानी समूहाची अवस्था पाहून त्यांच्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला धक्का बसला आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजाराचे ओव्हरव्हॅल्युड होते, जे आता करेक्शन मोडमध्ये आहे. 24 जानेवारीपासून आतापर्यंत अदानी समूहासाठी सकारात्मक असलेली एक गोष्ट म्हणजे कोणत्याही भारतीय रेटिंग एजन्सीने आपले रेटिंग किंवा दृष्टीकोन बदललेला नाही. तर 25 जानेवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 21.7 टक्क्यांवरून 80 टक्क्यांवर घसरले आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी विशेषत: अल्पावधीत सावध पावले उचलण्याची गरज आहे.