गँगस्टर चित्रपटात मिळाली होती मुख्य भूमिकेची ऑफर, शोएब अख्तरचा बॉलिवूडबद्दल दावा


पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेला अख्तर हा पाकिस्तानच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने क्रिकेटमध्ये खूप काही मिळवले, पण त्याला नेहमीच चित्रपटात काम करायचे होते. त्याला बॉलिवूडमध्ये काम करायचे होते. पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने याबाबत खुलासा केला आहे.

अख्तरने सांगितले की, त्याला बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या क्राइम-ड्रामा चित्रपट गँगस्टर (2005) मध्ये काम करण्याची ऑफर आली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, त्याला गँगस्टरमध्ये मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. गेल्या वर्षी अख्तरने त्याच्या बायोपिकचे नाव जाहीर केले होते. त्याचे शीर्षक होते ‘रावळपिंडी एक्सप्रेस: ​​रेसिंग अगेन्स्ट द ऑड्स’. मात्र, या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली आहे की नाही, याची माहिती नाही. गेल्या महिन्यात अख्तरने ट्विटरवर याबाबत एक पोस्ट टाकली होती. त्याने या चित्रपटापासून स्वत:ला वेगळं करण्याचा निर्णय घेतला होता.

क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. दोन्ही संघांमधील उत्साह, भावना आणि उत्कटता खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम देण्यास प्रोत्साहित करते. शोएब अख्तर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम आणि घातक वेगवान गोलंदाज होता. त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत, अख्तरने अनेक वेळा मॅच-विनिंग चेंडू टाकले. भारताविरुद्धही त्याची कामगिरी प्रभावी ठरली आहे.

भारताविरुद्धच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 10 कसोटीत 28 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने टीम इंडियाविरुद्ध 28 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 विकेट घेतल्या. अशाप्रकारे त्याने 38 सामन्यात 69 विकेट घेतल्या. अख्तरने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने 46 कसोटीत 178 बळी घेतले. त्याचबरोबर त्याने 163 एकदिवसीय सामन्यांमध्ये 247 विकेट घेतल्या आहेत. अख्तरने 15 टी-20मध्ये 19 विकेट घेतल्या आहेत.