‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023’ च्या रेड कार्पेटवर बॉलीवूड स्टार्सच्या मेळाव्याने उपस्थिती लावली. या अवॉर्ड शोमध्ये रेखापासून आलिया भट्टपर्यंत सिनेजगतातील सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुपम खेर, वरुण धवन आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.
‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ काश्मीर फाईल्स सर्वोत्कृष्ट चित्रपट, पहा संपूर्ण यादी
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कारांची संपूर्ण यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (‘चूप’)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
- मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर: ऋषभ शेट्टी (कंतारा)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनीष पॉल (जुगजुग जिओ)
- चित्रपटांमधील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार: रेखा
- सर्वोत्कृष्ट वेब सीरिज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस क्रिटिक्स
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
- वर्षातील चित्रपट: आरआरआर
- टेलिव्हिजन सिरीज ऑफ द इयर: अनुपमा
- मोस्ट व्हर्सटाइल अॅक्टर ऑफ द इयर : अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स)
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावान)
- टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: तेजस्वी प्रकाश (नागिन)
- सर्वोत्कृष्ट पुरुष गायक- सचेत टंडन ( मैय्या मैनु)
- सर्वोत्कृष्ट गायिका- नीती मोहन (मेरी जान)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)
- संगीतातील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार: हरिहरन