एमएस धोनीच्या आयुष्यात ‘नव्या पाहुण्या’ची एन्ट्री, माहीने ओवाळून टाकला जीव


एमएस धोनी पुढील महिन्यापासून आयपीएलमध्ये व्यस्त असेल. आयपीएल 2023 चा पहिला सामना त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि विद्यमान विजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी धोनीच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याने प्रवेश केला आहे.

दरम्यान धोनी नवीन पाहुण्याकडे लक्ष देऊ शकत नाही. खरंतर धोनीला बाइक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे खूप चांगला संग्रह देखील आहे.

अनेकवेळा तो रांचीच्या रस्त्यांवर सायकल चालवतानाही दिसला आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या बाईक आहेत, तसेच कमी किमतीच्या बाईकही आहेत.

तो अलीकडे TVS Apache RR 310 वर दिसला होता. आता भारताच्या माजी कर्णधाराने त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी एक बाईक जोडली आहे.

नवीन TVS रोनिनने त्याच्या कलेक्शनमध्ये प्रवेश केला आहे. ज्यावरून त्याची नजर हटत नाहीये. नवीन बाईकसोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.