तुम्हाला SBI कडून आला आहे का हा मेसेज? काळजी घ्या… नाहीतर रिकामे होईल खाते


तुमचे देखील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते आहे का? जर होय, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. SBI खातेधारकांना OTP किंवा कोणत्याही सेवेबद्दल माहिती देण्यासाठी बँकेकडून अनेकदा मेसेज पाठवले जातात. मात्र याचा फायदा फसवणूक करणारेही घेतात. ते ग्राहकांना अनेक बनावट संदेश पाठवतात, जिथे एक लिंक दिली जाते. ग्राहक चुकून किंवा घाईने त्यावर क्लिक करतात, ज्यामुळे त्यांचे खाते काही वेळातच रिकामे होते.

अलीकडे अनेकांना एसबीआयकडून फोनवर असाच मेसेज येत आहे. आता सरकारी एजन्सी पीआयबीने यासाठी तथ्य तपासणी केली आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने एसबीआयच्या मेसेजची माहिती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की SBI खातेधारकाचे SBI Yono खाते ब्लॉक करण्यात आले आहे. कृपया तुमचे पॅन कार्ड तपशील अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा. यासोबतच एसएमएसमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे.

पीआयबीने आपल्या फॅक्ट चेकमध्ये हा फेक मेसेज असल्याचे सांगितले आहे. ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो खाते ब्लॉक केल्याचा दावा केला आहे.

PIB म्हणते की, कोणत्याही ईमेल किंवा एसएमएसमध्ये तुम्हाला बँक तपशील विचारले जातात, त्यांना प्रतिसाद देऊ नका. दुसरे, तुम्हाला असा कोणताही एसएमएस मिळाल्यास, त्याची लगेच रिपोर्ट[email protected] वर तक्रार करा.

असा कोणताही संदेश एसबीआयने ग्राहकांना पाठवलेला नाही. तसेच बँकेकडून एसएमएस किंवा ईमेलवर ग्राहकांकडून बँक खात्याची माहिती मागवली जात नाही.