IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला धक्का, डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या कसोटीतून बाहेर


डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी आता मॅट रेनशॉ दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. वॉर्नरच्या दुखापतीमुळे आता रेनशॉ दुस-या कसोटी सामन्यात कंसशन प्लेयर म्हणून खेळणार आहे. पहिल्या दिवशी वॉर्नर फलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाज सिराजचा बाउन्सर त्याच्या हेल्मेटला लागला. मात्र, चेकअपनंतर त्याने फलंदाजी पूर्ण केली आणि 15 धावा करून तो बाद झाला. मात्र भारतीय फलंदाजीदरम्यान तो पूर्ण वेळ मैदानावर पोहोचला नाही.


दरम्यान गेल्या वर्षीच, ICC ने Concussion Substitute नियम लागू केला आहे, ज्यामध्ये जर एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर, 15 सदस्यीय संघात समाविष्ट असलेला दुसरा खेळाडू त्या खेळाडूऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो. वास्तविक, जर वॉर्नर फलंदाज असेल, तर कंकशन सबस्टिट्यूट खेळाडू हा फलंदाज असला पाहिजे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाने मॅन रेनशॉचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.