जागतिक क्रिकेटची उडाली झोप, 6 प्रकरणांमध्ये अव्वलस्थानी टीम इंडिया


15 फेब्रुवारी हा दिवस टीम इंडियासाठी खास आहे. कारण टीम इंडिया आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये नंबर 1 टीम बनली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने दुस-या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारतीय संघ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये जागतिक किर्तीची क्षमता आहे. दरम्यान या 6 प्रकरणांमध्ये ती नंबर 1 बनली आहे.

टीम इंडिया टेस्ट रँकिंगच्या आधी जगातील नंबर 1 टी-20 टीम आहे. इतकंच नाही तर ती वनडेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

टी-20 मधील फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे तर सूर्यकुमार यादव जगातील नंबर 1 फलंदाज आहे.

मोहम्मद सिराज हा वनडे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज आहे. हा खेळाडू 21 वनडे खेळूनच पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

रवींद्र जडेजानेही पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. तो जगातील नंबर 1 कसोटी अष्टपैलू खेळाडू आहे.