इंटरनेटच्या युगात आपण सर्व प्रकारच्या वस्तू घरबसल्या ऑर्डर करतो. नव्या युगात आपण जुने मार्ग बदलले आहेत. आता आपण केवळ ऑनलाइन वस्तूंची ऑर्डर देत नाही, तर आपली जीवनशैली बदलली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे त्याचा आपल्या शरीरावरही वाईट परिणाम झाला आहे. पूर्वी आपण लस्सी, सत्तू शरबत प्यायचो, पण आजकाल थंड पेय पितो. पूर्वी आपण घरी चणे-शेंगदाणे खायचो, पण आज चिप्स खातोय. आठवत असेल लहानपणी आपण स्टीलच्या ताटात जेवण जेवायचो, पण आज आपण प्लास्टिकच्या ताटात अन्न खातोय. आपले पूर्वज भांडी धुण्यासाठी राख वापरायचे. पण आजकाल आपण डिश वॉशिंग साबण वापरतो. त्याचवेळी ऑनलाईन कंपन्या पुन्हा त्याच वस्तू लोकांना महागड्या किमतीत विकत आहेत.
मोफत उपलब्ध असलेली लाकूड राख Amazon वर 1800 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. तुम्ही या फोटोत पाहू शकता. अशाप्रकारे, अमेझॉनवर अशा अनेक वस्तू महाग मिळत आहेत, ज्या आपल्याला अगदी मोफत मिळत होत्या. शेणाच्या गवऱ्या असो वा कडूलिंबाची काठी असो, खाट असो वा पूजेसाठी लागणारी समिधा… सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे. पण यासाठी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागते.
अॅश पावडरच्या नावाने विकली जाणारी ही राख ऑनलाइन बाजारात 1800 रुपये किलो आहे. गाईच्या शेणाच्या नावाने शेण पॅक करून विकले जात आहे. यासाठी 450 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. च्यु स्टिक्स म्हणजे दातून, ते 100 ते 150 रुपयांना ऑनलाइन विकले जात आहे.
सभ्यतेच्या नावाखाली आपण अनेक गोष्टींचा त्याग केला आहे, परंतु प्रगतीमुळे आपण पुन्हा त्याच गोष्टी स्वीकारत आहोत. पूर्वी निसर्गाकडून या गोष्टी फुकट मिळत होत्या, पण आता त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.