पूर्ण चार्जवर जबरदस्त ड्रायव्हिंग रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एवढी आहे किंमत


भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरची मागणी वाढत आहे, त्यातच आता होप इलेक्ट्रिकने हैदराबाद ई मोटर शोमध्ये ग्राहकांसाठी आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Hop Oxo लॉन्च केली आहे. तेलंगणा राज्य सरकारने या मोटर शोचे आयोजन केले होते, या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत आणि या बाईकमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होप इलेक्ट्रिकच्या या नवीनतम बाईकची किंमत 1 लाख 60 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे जी 1 लाख 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कँडी रेड, ट्वायलाइट ग्रे, इलेक्ट्रिक यलो, मॅग्नेटिक ब्लू आणि ट्रू ब्लॅक अशा 5 वेगवेगळ्या रंगांमध्ये ही बाईक खरेदी करता येईल.

इलेक्ट्रिक मोटारसायकल 3.75 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे, जी एका चार्जवर 135 किमी ते 150 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते असा दावा केला जातो. बाईक BLDC हब मोटर वापरते जी 5.2 kW/6.2 kW ची पॉवर आणि 185 Nm/200 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Hop Oxo इलेक्ट्रिक बाईक 90 kmph/95 kmph पर्यंत टॉप स्पीड देते. 850W चार्जरच्या मदतीने ही बाईक 4 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते, या बाईकमध्ये कंपनीने पॉवर, इको, रिव्हर्स आणि स्पोर्ट असे चार राइडिंग मोड दिले आहेत.

जर आपण या इलेक्ट्रिक बाईकमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो, तर या मोटरसायकलमध्ये तुम्हाला 5-इंचाचा स्मार्ट LCD डिस्प्ले मिळेल आणि कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE सपोर्ट मिळेल. तसेच, ग्राहकांना या बाईकसह 128 बिट एन्क्रिप्शनचा लाभ मिळणार आहे.

सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक स्प्रिंग लोडेड शॉक ऍब्जॉर्बर्स आहेत. सुरक्षेसाठी कंपनीने या बाईकमध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टमसह डिस्क ब्रेकचा वापर केला आहे.