जोस बटलरने मोडला धोनीचा विक्रम, 4 दिवसात दोनदा संघासाठी बनला ‘संकटमोचक’


इंग्लंडच्या जोस बटलरने धोनीचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावताना त्याने हा पराक्रम केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बटलरने 127 चेंडूत 131 धावा केल्या. या शतकासह, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 व्या किंवा खालच्या क्रमाने सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला.

या प्रकरणात बटलरने भारताच्या एमएस धोनी आणि युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. दोघांच्या नावावर 5व्या किंवा खालच्या क्रमांकाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत 7-7 वनडे शतके आहेत.

बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या 3 विकेट अवघ्या 14 धावांवर पडल्या असताना बटलर फलंदाजीला आला. मात्र तिथून संघाचा डाव सांभाळताना त्याने केवळ शतकच केले नाही, तर संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील बटलर संघासाठी संकटमोचक ठरला, जेव्हा त्यांचे 3 विकेट केवळ 88 धावांवर पडल्या होत्या. त्या सामन्यात त्याने 83 चेंडूत 94 धावा केल्या, पण तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.