जातीय भेदभाव ; मध्यान्ह भोजन, या शाळेत दलित मुलांना फेकून दिले जाते जेवण


मध्य प्रदेशातील बुंदेलखंड परिसर आजही मागासलेला आहे. अनेकवेळा जातीभेदाची प्रकरणे येथून समोर आली आहेत, पुन्हा एकदा असेच प्रकरण येथून समोर आले आहे. छतरपूर येथील एका शाळेत मध्यान्ह भोजनाच्या वेळी विद्यार्थ्यांना जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. शाळेत जेवण बनवणारी बाई फेकून रोट्या देते, असा आरोप मुलांचा आहे. त्यांना शेवटी जेवण दिले जाते आणि बऱ्याच वेळा गरम चपात्याही हातावर ठेवल्या जातात. हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील बुदौर गावातील दलित वस्ती येथील शासकीय प्राथमिक शाळेशी संबंधित आहे.


मध्यान्ह भोजनात भेदभाव करण्याबरोबरच त्यांच्यासोबत अस्पृश्यताही होत असल्याचा आरोप शाळेत शिकणाऱ्या मुलांनी केला आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले, येथील जेवण चांगले नाही, रोज फक्त बटाट्याची भाजी, डाळी आणि रोटी बनते. चपाती आमच्यावर फेकली जाते. ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे पथक शाळेत पोहोचले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या आरोपांची पुष्टी झाल्यानंतर मध्यान्ह भोजन बनवणारा गटच मोडीत काढण्यात आला.

शिक्षण विभागाचे डीपीसी आरपी लाखेरा यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण घटनास्थळी पोहोचलो. शाळेत शिकणाऱ्या मुलांशी बोललो. त्यांच्यासोबत जेवण केले. यासोबतच शाळेत जेंव्हा जेंव्हा जेवण तयार केले जाईल, तेंव्हा ही मुले प्रथमच त्या जेवणाचे वाटप करतील असा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात अस्पृश्यतेसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र देण्यात आले आहे. यानंतरही अशी पुनरावृत्ती कुठेही आढळल्यास शिक्षकांनाही दोषी धरले जाईल.