जोफ्रा आर्चरने एकट्याने उध्वस्त केला अर्धा अफ्रिकन संघ, मोडला 30 वर्षे जुना विक्रम


भाऊ, दुखापतीतून वापसी असावी तर जोफ्रा आर्चरसारखी, नाहीतर नको. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या दुसऱ्याच सामन्यात इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने असा पराक्रम केला की, 30 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त झाला.

जोफ्रा आर्चरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हा पराक्रम केला. इंग्लंडने हा सामना 59 धावांनी जिंकला, ज्यामध्ये आर्चरने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी पाठवण्याचे काम केले.

दुखापतीतून परतल्यानंतर आर्चरचा हा दुसरा एकदिवसीय सामना होता, ज्यात त्याने 9.1 षटकात 40 धावा देत 6 बळी घेतले. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेतील 30 वर्षे जुना विक्रम मोडला.

आर्चरच्या कामगिरीची नोंद आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही परदेशी गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी म्हणून नोंदवली गेली आहे. या प्रकरणात त्याने वसीम अक्रमचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. अक्रमने 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 16 धावांत 5 बळी घेतले होते.

आर्चरने दक्षिण आफ्रिकेत चमत्कार केले. याशिवाय आता तो परदेशी भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारा इंग्लिश गोलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्याने 12 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात ख्रिस वोक्सने केलेला विक्रम मोडला. वोक्सने 45 धावांत 6 बळी घेतले होते.