एका षटकात 17 चेंडू, 7 वाईड- 4 नो बॉल, आता हा गोलंदाज निवडणार पाकिस्तानचा संघ


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि अटकळानंतर अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली नवीन निवड समिती स्थापन केली आहे. पाकिस्तान बोर्डाने चार माजी कसोटीपटूंचा समावेश असलेली वरिष्ठ निवड समिती नेमली आहे.

पीसीबीने बुधवारी माजी कसोटी फलंदाज हारून रशीद आणि कामरान अकमल यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ आणि कनिष्ठ पुरुष निवड समित्यांची घोषणा केली.

हारून व्यतिरिक्त वरिष्ठ निवड समितीमध्ये कामरान अकलम, यासिर हमीद आणि माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद सामी असतील. कामरान, यासिर आणि सामी यांची राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सामी त्याच्या वेगासाठी जितका प्रसिद्ध होता, तितकाच त्याच्या 17 चेंडूंच्या विक्रमी षटकासाठी प्रसिद्ध होता. सामीने 2004 च्या आशिया कप सामन्यात बांगलादेशविरुद्ध 7 वाइड आणि 4 नो-बॉलमुळे 17 चेंडूंचे ओव्हर टाकले होते.

दुसरीकडे, तौसीफ अहमद, अर्शद खान, शाहिद नझीर आणि शोएब खान हे कनिष्ठ निवड समितीमध्ये कामरान अकलमच्या अध्यक्षतेखाली संघाची निवड करतील.