तत्काळ पासपोर्टसाठी असा करा अर्ज; तुम्हाला गरज आहे फक्त या कागदपत्रांची


आजच्या काळात पासपोर्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. पासपोर्ट हा केवळ महत्त्वाचा कागदपत्र नाही, तर भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. जर तुम्हाला घाईत एखाद्या देशात जावे लागले आणि तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर घाबरू नका.

वास्तविक, ‘तत्काळ पासपोर्ट’च्या मदतीने तुम्ही तुमचा पासपोर्ट पटकन बनवू शकता. हा पासपोर्ट 3 ते 5 दिवसात तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल. या संदर्भात, आज आम्ही तुम्हाला तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करू शकता आणि तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे देखील सांगणार आहोत.

तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम पासपोर्ट सेवेच्या अधिकृत पोर्टलवर आपली नोंदणी करा.
  • आता तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • तुम्हाला दोन पर्याय दिसतील (फ्रेश आणि रि-इश्यू). तुम्हाला दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागेल.
  • स्कीम प्रकारातील ‘तत्काळ’ पर्याय निवडा.
  • अर्ज डाउनलोड करा आणि फॉर्म भरा.
  • आता फॉर्म ऑनलाइन सबमिट करा.
  • पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
  • ऑनलाइन पेमेंट पावतीची प्रिंट काढा.
  • तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रावर आता अपॉइंटमेंट बुक करा.

तत्काळ पासपोर्टसाठी आहेत ही आवश्यक कागदपत्रे

  • परिशिष्ट एफ नुसार पडताळणी प्रमाणपत्र
  • खालील कागदपत्रांपैकी कोणतेही 3 दस्तऐवज:-
  • मतदार ओळखपत्र
  • सेवा फोटो ओळखपत्र
  • SC/ST/OBC प्रमाणपत्र
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
  • शस्त्र परवाना
  • शिधापत्रिका
  • मालमत्तेची कागदपत्रे
  • पेन्शन दस्तऐवज
  • रेल्वे फोटो ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • मान्यताप्राप्त संस्थेचे विद्यार्थी ओळखपत्र
  • चालक परवाना
  • जन्म प्रमाणपत्र
  • गॅस कनेक्शन बिल